ARDHAPUR UPDATE

News | Updates | Blogs

300 ई मस्टर झीरो करणाऱ्या अधिकाऱ्याला वरिष्ठांकडून पदभाराचे गिफ्ट

300 ई मस्टर झीरो करणाऱ्या अधिकाऱ्याला वरिष्ठांकडून पदभाराचे गिफ्ट, पालम मधील स्थिती, शेतकऱ्यांची केली अडवणूक.

झीरो

परभणी/शांतीलाल शर्मा:

पालम – येथील पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी पदाचा पदभार असताना नवीन रुजू होणाऱ्या बीडिओ ची वाट पाहत विविध कारणे देत तब्बल 300 ई मस्टर झीरो करणाऱ्या सहायक गट विकास अधिकारी उदय शिसोदे यांना वरिष्ठ अधिकाऱ्याकडून गिफ्ट देण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काळातही शेतकरी व सर्व सामान्य यांची अडवणूक होण्याची चर्चा एकावयास मिळत आहे.

हे वाचा: राष्ट्रवादी काँग्रेससह तीन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा रद्द


पालम येथे बिडीओ पद रिक्त असल्याने जिल्हा परिषदेत वरिष्ठ अधिकारी वर्गा सोबत फिल्डींग लावत शिसोदे यांनी पदभार घेतला होता. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी ट्रकभर पुष्प हार व गुच्छ घालून त्यांचे स्वागत केले होते.

सर्व सामान्य लोकांची कामे मार्गी लागतील ही आशा होती. पण ती फोल ठरली होती. रोजगार हमी याजनेत कामे करण्यापेक्षा ती कशी टाळता येतील यातच पंचायत समितीमध्ये वेळ घालवला जात होता.

सिंचन विहीर,मातोश्री पांदन रस्ता, घरकुल योजना, शेतकऱ्याची वैयक्तिक फळबाग लागवड योजना याची मजुरांचे आनलाईन प्रणालीद्वारे काढलेले तब्बल 300 पेक्षा जास्त ई मस्टर विविध कारणे लावून झीरो केले गेले आहेत. त्यामुळे रोहयो अंतर्गत कामाचा बट्या बोळ झाला असून आराखड्या प्रमाणे हजारो मनुष्य बुडाले आहेत.

तसेच हजारो कामे बंद पडून रोजगारावर उपासमारीची वेळा आली आहे. ही कामे बंद झाल्याने गावोगाव शेकडो मजूर ऊसतोड,वीटभट्टी, मजूर काम करण्यासाठी स्थलांतरित झाले आहेत. तरीही जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने मनमानी करीत पुन्हा निष्क्रिय अधिकाऱ्याकडे पदभार दिला आहे. यामुळे नागरिकात प्रंचंड नाराजीचा सूर उमटत आहे.

RSS
Follow by Email
YouTube
WhatsApp
error: Content is protected !!