तालुका अध्यक्ष पदी नटवर बाहेती, सचिव पदी विलास बाहेती तर जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून अर्धापूर अपडेट न्यूज चॅनलचे संपादक अजित गट्टानी यांची निवड.
राजेश पळसकर:
आगामी वर्ष २०२३-२०२५ या कार्यकाळासाठी नांदेड जिल्हा माहेश्वरी सभा द्वारा, जिल्ह्यातील १६ तालुक्यात माहेश्वरी समाजाच्या नवीन कार्यकारणी साठी निवडणुका लागल्या आहेत.
दि. १२ मार्च रोजी अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे वर्तमान तालुका अध्यक्ष श्री अजित गट्टानी यांच्या अध्यक्षतेखाली ऐक मीटिंग बोलावण्यात आली होती. या वेळी समाजातील सर्व समाज बांधव उपस्थित होते.
या बैठकीत प्रामुख्याने निवडणूक न घेता ऐक मताने मालेगाव येथील व्यापारी नटरवरलाल बाहेती यांची अर्धापूर तालुक्याच्या नवीन तालुका अध्यक्ष्यपदी निवड करण्यात आली. तर सचिव पदी सध्या कार्यरत असलेले मालेगाव येथील व्यापारी श्री विलास बाहेती यांची परत निवड करण्यात आली.
तर नांदेड जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून तालुक्याचे सध्याचे अध्यक्ष अर्धापूर येथील व्यापारी आणि अर्धापूर अपडेट न्यूज चॅनेल चे संपादक अजित गट्टानी यांची निवड करण्यात आली.
हे वाचा: मुलांना पळवून विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश.
या निवडणूक प्रक्रियेला निवडणूक अधिकारी म्हणून श्री गोपालजी सारडा यांनी कामकाज बघितले. व झालेल्या निवडी बद्दल त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
या वेळी निवडणुकीत मालेगाव येथील व्यापारी सतीश बाहेती, संजय सारडा, मुन्ना बाहेती, विलास बाहेती, सुबोध सारडा, रामेश्वरजी बडायला, सुरेशजी दरक, अमोल सारडा, गोविंद भुतडा, गजानन भुतडा, अंकुश सोमाणी, आकाश सोमाणी, गणेश गट्टानी, नटवरलाल बाहेती, दिलीप बाहेती, दिनेश सारडा, मनोज सारडा, सचिन तोषणीवाल, राहुल तोषणीवाल आणि अजित गट्टानी यांनी सहभाग नोंदवला.
6 thoughts on “अर्धापूर तालुका माहेश्वरी समाजाच्या कार्यकारणीची निवड.”