शहरातील बी एस एन एल ची सेवा मागील चार महिन्या पासून बंद असून त्याचा नाहक त्रास ग्राहकांना होत आहे.
बंद असलेली सेवा तत्काळ चालू करण्याची मागणी ग्राहकांची मागणी.
अर्धापूर/राजेश्वर देशमुख:
अर्धापूर शहरातील बी एस एन एल ची फोन सेवा गेल्या चार महिन्यांपासून बंद असून येथील अभियंत्याला त्याचे काही “सोयर सुतक” नसल्या चे दिसत असून ते साधा फोन घेण्याची तसदी सुद्धा घेताना दिसत नाहीत.
मागील काही दिवसांपासून अनेक जणांनी अभियंता इंगोले यांना फोन करून सदर प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला पण हे महाशय फोन घेण्याची तसदी सुद्धा घेताना दिसत नाहीत आज पर्यंत त्यांच्याशी संपर्क सुध्दा झालेला नाही.
हे वाचा: जाणून घ्या 2023 मध्ये काय होणार: खगोल अभ्यासक-दा.कृ. सोमण
लाईनमन आपले काम करत असून ते अधिकारी कर्मचारी यांच्या कडे बोट दाखवत आहेत, जिल्हा दूरसंचार अधिकारी यांनी या प्रकरणी लक्ष देऊन ग्राहकांची होणारी आर्थिक लूट थांबवावी मागील चार महिन्यांपासून बंद असलेल्या फोन चे बील भरून ग्राहक संताप व्यक्त करत आहेत.
हे वाचा: चला महामानवाला अभिवादन करुया..
हा नाहक भुर्दंड सोसावा लागतो आहे अशी प्रतिक्रिया ग्राहक देत आहेत येथील अभियंत्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. तर काही जण ग्राहक मंचात तक्रार करणार असल्याचे सांगत आहेत अर्धापूर शहरातील बी एस एन एल कार्यालय असून “अडचण नसून, खळंबा” असेच काही झाले आहे.
तालुक्याचे ठिकाण असून येथे कुठलीही सुविधा उपलब्ध नाही याचे आश्चर्य वाटते आहे याचे मागे काय कारस्थान आहेत कळायला हवे व नागरिकांना होणारा त्रास कमी झाला पाहिजे अशी अपेक्षा ग्राहक व्यक्त करत आहेत.
More Stories
भोकर विधानसभेवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवा: राजेश पालमकर
शहीद कोठारी बंधू यांच्या स्मरणार्थ अर्धापूर येथे भव्य रक्तदान शिबिर
भोकर विधानसभेसाठी ६८ उमेदवारांनी भरले ७४ अर्ज