ARDHAPUR UPDATE

News | Updates | Blogs

अर्धापूर येथे बस स्थानक समोर सायकल स्वार जागीच ठार

अर्धापूर नगरपंचायत, महामार्ग पोलिस आणि के टी एल कंपनी यांच्या सामाईक षडयंत्र ने ऐका इसमाचा दुर्देवी मृत्यू. नागरिकातून तीव्र प्रतिक्रिया.

अर्धापूर

अर्धापूर:

शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यावरून जड वाहनास बंदी असताना आणि वसमत फाटा महामार्ग पोलिसांची चौकी असून सुद्धा शहरात जड वाहने सर्रास शिरत आहेत.


मंगळवारी दि.२८ रोजी सायंकाळी अश्याच ऐक जड वाहनाने बसस्थानक परिसरात ऐका सायकल स्वार व्यक्तीला चिरडले, त्यात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
ट्रक क्र. एम एच २६ एडी ३१२१ याने वाघोजी सखाराम लिंगायते या ४२ वर्षीय इसमाला सायकली वर जात असताना चिरडले.


के टी एल कंपनी ने शहरात सी सी रोड चे काम चालू केले असून त्यांच्या संथ गती मुळे काम खूप हळू चालू आहे, त्या मुळे मुख्य रस्त्याची फक्त ऐकच बाजू रहदारी साठी मोकळी आहे, त्यात जड वाहनांना सर्रास पणे शरातून जाण्याची परवानगी कोणी व का दिली? असे येथील नागरिक प्रश्न विचारत असून नगरपंचायत प्रशासनाकडून महामार्गावर होणाऱ्या अतिक्रमण बाबत आजपर्यंत कोणतेच पाऊल उचलले नसल्या मुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस खूप मोठ्या प्रमाणावर हात गाडे वाल्यांनी अतिक्रण करून दुकाने थाटली आहेत. या झालेल्या रस्त्यावरील अतिक्रमण मुळे वाहन धारकांना खूप अडचण जात आहे.


येवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेले अतिक्रमण नगर पंचायत का काढत नाही, महामार्ग पोलिस जड वाहनांस शहरातून जाण्याची परवानगी का देते आणि के टी एल कंपनी रस्त्याचे काम येवढ्या संथ गती ने का करते या तिन्ही प्रश्नांची उत्तरे नागरिकांना मिळत नसल्याने या ठिकाणी नगरपंचायत, महामार्ग पोलिस आणि के टी एल कंपनी यांच्यात काही तरी गोडबंगाल चालू असल्याची दबक्या आवाजात चर्चा चालू असल्याचे समजते.

तसेच मयत व्यक्ती भाऊराव चव्हाण साखर कारखान्याचे संचालक व्यंकटी साखरे यांच्या शेतातील सालगडी असल्याने जमलेल्या लोकांची या ठिकाणी तीव्र प्रतिक्रिया ऐकावयास भेटत आहे.

अर्धापूर शहराच्या विकास कामासाठी मागील ३ ते ४ वर्षांपासून अर्धापूर बायपास रोड चे काम चालू आहे. काही ना काही कारणास्तव त्या रोड चे काम बंद पडत होते. पण तो रस्ता सध्या वाहतुकीला चालू झाला आहे.

हे वाचा: मागील एक महिन्या पासून रोहित्र बंद,शेतकरी संतप्त आंदोलनाचा इशारा.


सध्या अर्धापूर शहरातील मुख्य रस्त्याचे सी सी रोड चे काम के टी एल कंपनी करत आहे. त्या मुळे जड वाहनास शहरात प्रवेश बंद आहे. त्यात के टी एल कंपनीच्या शहरातील कामाची गती खूपच संथ गती ने चालू आहे. सगळी कडे रस्ते खोदून ठेवले आहेत त्या मुळे शहरात धुळीचे साम्राज्य तयार झाले आहे. वाहनाची रहदारी जास्त असल्याने रस्त्यावरील धूळ नाका तोंडत जात आहे.

नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून प्रशासन आणि स्थानिक नेते, तसेच आमदार अशोकराव चव्हाण यांनी या गोष्टी ची दखल घेत कामाची गती वाढऊन सी सी रोड चे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे असे निर्देश के टी एल कंपनी ला द्यावे व रस्त्यावरील अतिक्रमण तत्काळ हटवण्यात यावे असे निर्देश नगरपंचायत ला देण्यात यावे असे नागरिकांतून आव्हान होत आहे.

RSS
Follow by Email
YouTube
WhatsApp
error: Content is protected !!