ARDHAPUR UPDATE

News | Updates | Blogs

बँक व फायनान्सच्या तगादयाला कटाळून पुयणी येथील शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

बँक व फायनान्सच्या तगादयाला कटाळून पालम तालुक्यातील पुयणी येथील ऐका शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

बँक

परभणी/शांतीलाल शर्मा:

पालम तालुक्यातील पुयणी यथिल शेतकरी याने बॅकेच्या कर्ज बाजारीपणा आणि फायनान्स कंपनी कडून होत असलेला तगादयाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना सोमवार दि. २४ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली. पुयनी येथील शेतकरी लालबा सुर्यभान सोळंके वय ५१ वर्ष या शेतकऱ्याने बँक आणि फायनानस कंपनी यांच्या जाचाला कंटाळून ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.


या घटनेची माहिती अशी की, लालबा सोळंके यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे २५ हजार रुपये व महिंद्रा होम फायनान्सचे दिड लाख रुपयांचे कर्ज होते. शेतातील सततच्या नापिकीमुळे कर्ज कसे फेडायचे या चिंतेत होते. त्यात फायनान्स कंपनीकडून कर्ज वसूलीसाठी एकसारखा तगादा लावण्यात आला होता.

हे वाचा: कामाला सॅल्युट कराल तर जग तुम्हाला सॅल्युट करेल: व्यंकटेश चौधरी

तीन वेळा त्यांना नोटीस देखील पाठवण्यात आल्या होत्या
या सर्व प्रकाराला कंटाळून सोमवारी पहाटे सोळंके यांनी घरासमोर लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली,तीन मुले नातवंडे असा मोठा परिवार आहे. पालम येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करूण त्यांची बॉडी नातेवाईकाच्या स्वाधिन केले असून पुढील तपास बीट जमादार कोलमवाड हे करत आहेत.

RSS
Follow by Email
YouTube
WhatsApp
error: Content is protected !!