ARDHAPUR UPDATE

News | Updates | Blogs

शेतात असलेल्या सेफ्टी टॅंकची सफाई करताना पाच जणांचा मृत्यू.

सोनपेठ परिसरात शेतात असलेल्या सेफ्टी टॅंकची सफाई करताना पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे.

शेतात

परभणी/ शांतीलाल शर्मा:

सोनपेठ शहराजवळील गंगाखेड रोडजवळील भाऊचा तांडा शिवारातील आखाड्यावर असलेल्या सेफ्टी टॅंकची सफाई करताना पाच जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवार दि. ११ रोजीच्या रात्री आठ ते नऊ च्या सुमारास घडली. दरम्यान मयत पाचही जण एकच कुटुंबातील असल्याची माहिती मिळाली आहे.

हे वाचा: गंगाधर पाटील चाभरेकर यांचा भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश.


भाऊचा तांडा शिवारात असलेल्या मारुती दगडू राठोड (इंजिनियर)यांच्या आखाड्यावरील सेफ्टी टॅंक सफाई चे काम गुरुवारी सायंकाळच्या सुमारास चालू झाली. काम चालू असताना शेख सादेक (४५), शेख शाहरुख (२०), शेख जुनेद (२९), शेख नवीद (२५), शेख फिरोज (१९) या पाच जणांचा मृत्यू झाला असून शेख साबेर (१८) हा जखमी झाला आहे.


याच्यावर परळी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. दरम्यान या घटनेतील मयत पाचही जण एकाच कुटुंबातील असल्याचे समजते रात्री च्या सुमारास शेतावर माहीती मिळताच परभणी च्या एस पी राख सुधा आर मॕडम यांच्या सह सोनपेठ पी.आय सुनील रणजीतवाड सह पोलीस बदोबस्त मोठा होता.पी एम साठी मयतताना परभणी येथे हलवण्यात आले आहे.

RSS
Follow by Email
YouTube
WhatsApp
error: Content is protected !!