ARDHAPUR UPDATE

News | Updates | Blogs

शिष्यवृत्ती परीक्षेत पिंपळगाव (म) शाळेचे घवघवीत यश

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला त्यात अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव (महादेव) येथील १० विद्यार्थी पात्र झाले आहेत.

शिष्यवृत्ती

अर्धापूर/राजेश पळसकर:

दरवर्षी प्रमाणे यशाची परंपरा कायम राखत फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पिंपळगाव (म) येथील १० विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.


शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ मधील उत्तीर्ण झालेले विद्यार्थी गुणानुक्रमे प्रथम कु. सोनाक्षी संतोषराव कदम, द्वितीय अर्जुन भागवत तुडमे, तृतीय कु.श्रावणी तुळशीराम शिंदे व इतर पात्र विद्यार्थ्यात संघर्ष आनंद दुधमल, संजय गणेश शिरडे,

कु.सायली शिवाजी कल्याणकर, सोहम दिगंबर उगे, गणराज गजानन कल्याणकर, कु.श्रेया सुरेश कल्याणकर व कु.समिक्षा सुनील दुधमल हे सर्व विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल तालुका गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन सोनटक्के, केंद्र प्रमुख विनोद देशमुख, मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी यांनी विद्यार्थी, वर्गशिक्षक केशव दादजवार,

सौ.अनिता पवार, मार्गदर्शक शिक्षक सुरेश शिंदे, श्रीधर तांदळे व शेख मॅडम, सौ.संगिता बोमनगे व कु.अनिता जज्जरवार यांचे अभिनंदन केले.

हे वाचा: गारपीठीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान; पंचनामे करून मदतीची मागणी


गावच्या सरपंच सौ.वर्षा शिवाजीराव खंडागळे, उपसरपंच संतोषभाऊ कल्याणकर, शा. व्य.समिती अध्यक्ष शामराव कल्याणकर, उपाध्यक्ष जगनभाऊ देशमुख, पोलीस पाटील उल्हासराव कल्याणकर, माजी सरपंच सदाशिवराव देशमुख,

वसंतराव देशमुख, माजी पंस सदस्य बालाजीराव कल्याणकर, प्रहारचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव देशमुख सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित मंडळी व पालक हे विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करत आहेत.

RSS
Follow by Email
YouTube
WhatsApp
error: Content is protected !!