१८ तास अभ्यास करून महामानवाला अभिवादन, अर्धापूर येथे १८ तास अभ्यास कार्यक्रमाचे आयोजन प्रज्ञा बौद्ध विहार, डॉ. आंबेडकर नगर, अर्धापूर येथे करण्यात आले.
राजेश पळसकर:
“जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या. रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल.” महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संदेशाचे अनुकरण करण्यासाठी शहरातील सार्वजनिक भिम जयंती मंडळाच्या वतीने १८ तास अभ्यास कार्यक्रमाचे आयोजन प्रज्ञा बौद्ध विहार, डॉ. आंबेडकर नगर, अर्धापूर येथे करण्यात आले.
हे वाचा: जाणून घ्या 2023 मध्ये काय होणार: खगोल अभ्यासक-दा.कृ. सोमण
अर्धापूर शहरातील प्रज्ञा बौद्ध विहार, डॉ. आंबेडकर नगर येथे महामानवडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आगळे वेगळे अभिवादन करण्यासाठी सार्वजनिक भिम जयंती मंडळाच्या वतीने १८ तास अभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ७२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शितलताई कांबळे यांच्या तर्फे अल्पोपहार वाटप करण्यात आले. सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक भिमराव साबळे यांच्या कडून बिस्किट वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मडळाचे अध्यक्ष प्रशांत कांबळे, उपाध्यक्ष अंबर मोरे, प्रवेश सरोदे, कोषाध्यक्ष महेंद्र सरोदे, सचिव संतोष बहादूरे, सहसचिव नागेश सरोदे, अमोल उद्धवराव सरोदे, त्रिरत्न सरोदे, केशव कांबळे, विलास सरोदे, राजू कांबळे, बालाजी देहाणे यांनी परिश्रम घेतले.
More Stories
भोकर विधानसभेवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवा: राजेश पालमकर
शहीद कोठारी बंधू यांच्या स्मरणार्थ अर्धापूर येथे भव्य रक्तदान शिबिर
भोकर विधानसभेसाठी ६८ उमेदवारांनी भरले ७४ अर्ज