ARDHAPUR UPDATE

News | Updates | Blogs

“केरळ स्टोरी ” पाहण्यासाठी नांदेडकरांची तुफान गर्दी.

“केरळ स्टोरी ” पाहण्यासाठी पीव्हीआर सिनेमाचे बुधवार दि.१० मे ची सर्व ५ शो ची सम्पूर्ण तिकिटे आरक्षित करण्यात आली असून, ती लवकरच उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.

केरळ स्टोरी

राजेश पळसकर:

लव्ह जिहाद या स्फोटक विषयावर आधारित ” केरळ स्टोरी ” या चित्रपटाच्या ट्रेलर ने सोशल मीडियामध्ये धुमाकूळ घातला असून शुक्रवारपासून हा चित्रपट पीव्हीआर नांदेड येथे दाखविण्यास सुरुवात झाली असल्यामुळे नांदेड शहरातील १२५५ तरुणी व महिलांना केरळ स्टोरी हा सिनेमा मोफत दाखविण्याचा निर्धार करण्यात आला आहे.त्यासाठी पीव्हीआर सिनेमाचे बुधवार दि.१० मे ची सर्व ५ शो ची सम्पूर्ण तिकिटे आरक्षित करण्यात आली असून, ती लवकरच उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.

यापूर्वी देखील ” कश्मीर फाईल्स ” हा चित्रपट दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून लोकसहभागाद्वारे अडीच हजारापेक्षा जास्त तरुणांना मोफत दाखविण्यात आला होता. अनेक सत्य घटनेच्या निष्कर्षावर काढण्यात आलेला ” केरळ स्टोरी ” हा चित्रपट प्रत्येक तरुणीनी पहावा असे आवाहन भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सुद्धा केले आहे.

त्यामुळे भाजपा महानगर नांदेड तसेच लायन्स क्लब नांदेड सेंट्रल आणि अमरनाथ यात्री संघ नांदेडच्या वतीने लोकसहभागातून १२५५ तरुणांना तिकीटे देण्यात येणार आहेत. या प्रोजेक्टला मिशन केरळ स्टोरी हे नाव देण्यात आले आहे.

आता पर्यंत डोनेशन द्वारे मिळालेली ४१८ तिकिटे मिळाली आहेत. त्यामध्ये जय श्री राम मित्र मंडळानी ७० तिकीटे तर
शिवा मामडे,गणेश महाजन बाऱ्हाळी,धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी प्रत्येकी ६६ तिकिटासाठी देणगी दिली आहे.लायनेस रेश्मा धनंजय डोईफोडे,सचिन शिवलाड,रघु गज्जेवार एक राष्ट्रप्रेमी नागरिक, एक राष्ट्रप्रेमी महिला तसेच युवा नेते कुणाल चौधरी यांनी प्रत्येकी २० तिकीटे दिली आहेत.

याशिवाय दहा तिकिटे देणाऱ्या मध्ये भडके कॉम्प्युटर,एक राष्ट्रप्रेमी नागरिक,महेश माहेवार यांचा समावेश आहे. दिलीप ठाकूर यांनी पीव्हीआर सिनेमाच्या मॅनेजमेंटसोबत चर्चा करून एका दिवसाचे सर्व ५ शो ची सर्व तिकिटे आरक्षित करण्यात आली आहेत. सिनेमाच्या वेळा पुढीलप्रमाणे आहेत. सकाळी ९.३०, दुपारी १.२०, दुपारी ३.५०, रात्री ७.५०, रात्री १०.५० अशा राहणार आहेत.एका तिकिटाची किंमत ₹१४० आहे. तसेच मध्यंतरात ₹ १०० चे पॉपकार्न व कोल्ड्रिंग देण्यात येणार आहे.त्यामुळे एकूण ₹ २४० किंमत असलेले तिकीट पूर्ण मोफत दिल्यास अनेकजण चित्रपट पाहण्याला येत नसल्यामुळे तिकीट वाया जाते.

त्यावर उपाय म्हणून फक्त ₹ ५० दिल्यानंतर एक तिकीट तरुणीना मिळतील. तरुणीनी जरी ₹ ५० ला तिकीट घेतले तरी त्यांना १०० रुपयांचे पॉपकार्न मिळणार असल्यामुळे ” केरळ स्टोरी ” हा चित्रपट मोफतच पाहायला मिळणार आहे.

हे वाचा: गंगाधर पाटील चाभरेकर यांचा भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश.

सिनेमा व पॉपकार्नच्या एकत्रित किमतीच्या २४० रुपयांपैकी ४० रुपयांची सवलत पीव्हीआर सिनेमाच्या मॅनेजमेंटने दिली आहे. उर्वरित रुपये १५० लोकसहभागातून जमा करण्यात येणार आहे. मंगळवार रोजी तिकिटे भाऊ ट्रॅव्हल्स कला मंदिर समोर नांदेड आणि सोनवणे मेडिकल श्रीनगर नांदेड येथे मिळणार आहेत.९४२१८ ३९३३३ या मोबाईलवर गुगल पे अथवा फोन पे द्वारे देणगीदारांनी कमीत कमी ₹ ३००० जमा करून २० तिकिटे स्पॉन्सर केल्यास त्यांची नावे दररोज सोशल मीडियातून प्रसिद्ध करून किमान एक लाख लोकांपर्यंत माहिती पोहोचविण्यात येणार आहे.

हे वाचा: शिष्यवृत्ती परीक्षेत पिंपळगाव (म) शाळेचे घवघवीत यश

देणगी देणाऱ्यांची नावे शो च्या दिवशी पीव्हीआर सिनेमाच्या समोर होडिंगद्वारे जाहीर करण्यात येणार आहेत. तसेच उद्घाटनाच्या वेळी त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त देणगीदारांनी एकूण ८३७ तिकिटे देण्यासाठी दिलीप ठाकूर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

RSS
Follow by Email
YouTube
WhatsApp
error: Content is protected !!