ARDHAPUR UPDATE

News | Updates | Blogs

आगामी निवडणुका निमित्त जिल्हाधिकारी यांची भोकर येथे आढावा बैठक संपन्न.

जिल्हाधिकारी

भोकर: आगामी निवडणुका निमित्त जिल्हाधिकारी यांची भोकर येथे विधानसभा ८५ भोकर आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणूक निमित्त आढावा बैठक संपन्न.

नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १८ रोजी भोकर येथे आगामी २०२४ विधानसभा ८५-भोकर तसेच लोकसभा २०२४ पोटनिवडणूक निमित्य नियुक्त करण्यात आलेल्या झोनल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.

हे वाचा: अर्धापूर तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळेवर शिक्षणाधिकारी कडक कारवाई करणार का? राज्य शासनाच्या नियमांचे उल्लंघन

उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकर या ठिकाणी विधानसभा ८५-भोकर अंतर्गत सर्व झोनल अधिकारी यांची आढावा बैठक घेऊन विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ तसेच नांदेड लोकसभा पोटनिवडणूक २०२४ अनुषंगाने त्यांना आदर्श आचार संहितेच्या अंमलबजावणी तसेच मतदान दिवशी व त्यापूर्वी एक दिवस आधी मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने कोणकोणती कामे करणे आवश्यक आहेत याबाबत मार्गदर्शन केले तसेच मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून कोणत्या संभाव्य चुका होऊ शकतात याबाबत पण सविस्तर मार्गदर्शन केले व त्या चुका होऊ नयेत यासाठी संबंधित झोनल अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन झोन मधील सर्व मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

तसेच बैठकीनंतर मा. श्री. अभिजित राऊत (जिल्हाधिकारी नांदेड) यांनी ई.व्ही.एम. मशीन ठेवण्यात येणाऱ्या स्ट्रॉंग रुमची पण पाहणी केली. यावेळी मा. श्री. प्रविण मेंगशेट्टी (निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भोकर), मा. श्री. विनोद गुंडमावर (सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भोकर तथा तहसीलदार भोकर), मा. श्री. रेणुकादास देवणीकर (सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भोकर तथा तहसीलदार अर्धापूर), मा. श्री. आनंद देऊळगावकर (सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भोकर तथा तहसीलदार मुदखेड) व इतर मान्यवर अधिकारी उपस्थित होते.

संपादक

RSS
Follow by Email
YouTube
WhatsApp
error: Content is protected !!