ARDHAPUR UPDATE

News | Updates | Blogs

परभणी येथे प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे आयोजन

परभणी येथे खासदार संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे आयोजन दि.१३ ते १७ जानेवारी रोजी करण्यात आले आहे.

ARDHAPUR UPDATE NEWS:

परभणी/शांतीलाल शर्मा:

परभणी

परभणी येथे दिनाक 13 ते 17 जानेवारी रोजी सायंकाळी 4 ते 7  दरम्यान लक्ष्मीनगर पाथरी रोड परभणी येथे शिवपुराण कथेचे आयोजन केले आहे.तरी या कथेसाठी मोठया प्रमाणात नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान आयोजका कडून करण्यात आले आहे.


राष्ट्रीय महामार्गावरील पाथरी रस्त्यावर असलेल्या लक्ष्मी नगर येथील 60 एकर च्या मोकळ्या जागेत शिवपुराण कथा वक्ते प.पू. पंडित श्री.प्रदीपजी महाराज मिश्रा यांच्या शिवपुराण कथेच्या निमित्ताने खासदार संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते भव्य दिव्य स्वरूपात परिपुर्णते बाबत युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे.

हे पण वाचा: नरेंद्राचार्य महाराज पादुका दर्शन सोहळा १२ जाने रोजी लोह्यात


भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी वेगवेगळ्या समितींच्या माध्यमातून चोख नियोजन करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पाथरी रस्त्यावर विस्तीर्ण अशा 60 एकरच्या परिसरात 13 ते 17 जानेवारी या दरम्यान राष्ट्रीय पातळीवरील शिवपुराणकथेचे आपल्या ओजस्वी वाणीतुन निरूपण करणारे पंडित श्री प्रदीपजी महाराज मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

हे वाचा: व्हाईस मीडियाच्या पालम तालुका अध्यक्ष पदी शांतीलाल शर्मा

या कथेसाठी एक ते दोन लाख भाविक उपस्थित राहतील असा अंदाज आहे .कथेसाठी १६५ बाय ७०० स्क्वेअर फुटाचा मंडप उभारण्यात येत आहे. जर्मन टेक्नॉलॉजीचा हा डोम असून त्यात एकही खांब  नाही हे त्यामागील वैशिष्ट्य आहे. कथेच्या निमित्ताने संपूर्ण परिसर हा स्वच्छ करण्यात आला आहे. बाहेर गावाहून येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था यावरही विशेष भर देण्यात येत आहे.

हे वाचा: सायळा येथील ग्रामस्थांचे पालम तहसिल समोर उपोषण.

हे वाचा: पॅन-आधार जोडण्यासाठी सरकार ने दिली शेवटची तारीख

पार्किंग व्यवस्था:

केवळ परभणी जिल्हाच नव्हे तर संपूर्ण मराठवाडा तसेच परराज्यातूनही भाविक शिवपुराण कथेचे श्रवण करण्यासाठी परभणीत येणार आहेत .पाथरी शहरातून  कथेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी चैतन्य नगरी ,समर्थ नगर संचारेश्वर नगरी शिवांशवाडी ,फ्रुट मार्केट समोरील पटांगण या ठिकाणी तर जिंतूर येथून येणाऱ्या भाविकांसाठी नवरचना प्रतिष्ठान च्या पाठीमागील २५ एकर च्या जागेवर पार्किंग व्यवस्था उभारण्यात आली आहे.

परभणी येथील नागरिकांसाठी पार्किंग व्यवस्था:

परभणीतील वाहनांसाठी ज्ञानोपासक महाविद्यालय ,शेळके यांचा मळा तसेच शहाणे त्याचबरोबर सराफ यांच्या शेतातील जागा रेणुका नगरी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

सुरक्षा व्यवस्था आणि सुविधा:

वेगवेगळ्या ठिकाणी १५० C.C. टीव्ही कॅमेराच्या माध्यमातून संपूर्ण परिसराची सुरक्षा यंत्रणा देखरेखी खाली राहणार आहे. ३० एलईडी टीव्ही वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आल्या असून त्याच्या माध्यमातून भाविकांना  कथा पाहता/ऐकता येणारआहे. 

ज्येष्ठ नागरिक, आपत्कालीन, व इतर व्यवस्था :

ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली असून आपत्कालीन स्थितीसाठी पाच रुग्णवाहिका तैनात करण्यात आलेल्या आहेत. भाविकांसाठी मोफत पाणी तसेच इतर साहित्यांची व्यवस्था करण्यात येत असून जवळपास १५० हून अधिक दुकाने लावण्यात येणार आहेत यात धार्मिक साहित्य विक्री, पूजा साहित्य आणि अयोध्या तसेच मथुरा येथील स्वादिष्ट अशा मिठाई आणि भोजन सामग्रीचे दुकाने लावण्यात येणार आहेत.

भाविकांसाठी येण्या जाण्याची व्यवस्था:

परभणी शहरातील भाविकांसाठी बस स्थानक आणि रेल्वे स्टेशन येथून कथा मंडपा पर्यंत येण्यासाठी सोमनाथ धोत्रे आणि मित्र मंडळाच्या माध्यमातून ऑटो रिक्षा ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. चार वैद्यकीय कक्ष तयार होत असून स्वच्छतागृह आणि इतर यंत्रणा देखील सज्ज ठेवण्यात येत आहेत येणाऱ्या महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी शंभर महिला बाऊन्सर मदतीला राहणार आहेत एकूणच या सर्व कार्यासंदर्भात दररोज खासदार जाधव हे सर्व कामांवर जातीने लक्ष देत असून कार्यकर्त्यांच्या मदतीने कार्य पूर्ण करून घेत आहेत.

RSS
Follow by Email
YouTube
WhatsApp
error: Content is protected !!