अर्धापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जंयती निमित्त खंडोबा मंदिर परिसरात भव्य शोभायात्रा व पुजन करण्यात आले.
अर्धापूर/अजित गट्टानी:
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे अवघ्या हिंदूस्थानाच्या प्रेरणास्थान आहेत. जेव्हा मुघल, निजामशाहीत हिंदूसंस्कृतीवर हल्ले होत होते, मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदुसंस्कृतीत प्राण फुंकले, त्यांचा जीर्णोद्धार केला. अनेक घाट, बारव बांधले. मंदिरांचे पुनर्निर्माण केलं, स्त्रीयांना सन्मान मिळवून दिला. लोकहितासाठी कुशल प्रशासनाचा वस्तूपाठ त्यांनी घालून दिला.
दि.१४ रोज बुधवारी अर्धापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जंयती निमित्त खंडोबा मंदिर परिसरात भव्य शोभायात्रा व पुजन करण्यात आले.
हे वाचा: तेलंगणा प्रमाणेच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणार – कदम
यावेळी नगरपंचायत चे मुख्याधिकारी शैलेश फडसे, अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बबनराव बारसे,भाजपा चे युवक जिल्हाध्यक्ष अँड किशोर हाट्टेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निळकंठ मदने, काँग्रेस शहराध्यक्ष राजेश्वर शेटे
उपनगराध्यक्ष मुसवीर खतीब, नगरसेवक प्र. प्रवीण देशमुख, नगरसेवक प्र. व्यंकटराव राऊत, नगरसेवक डॉ.विशाल लंगडे, गटनेते बाबुराव लंगडे, शिवसेनेचे शहराध्यक्ष सलाऊदीन काझी, रमेश पाटील, माजी नगरसेवक बबनराव लोखंडे, समाजसेवक आनंद सिनगारे, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे संचालक व्यंकटराव साखरे
मा.नगरसेवक तुकाराम साखरे, पत्रकार सखाराम क्षिरसागर, पत्रकार गोविंद टेकाळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष पिराजी साखरे, आदी मान्यवर सह गावातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे वाचा: बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करा: मुख्यमंत्री शिंदे
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो. मारोती बारसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जंयती मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोलाचे योगदान दिले.
More Stories
भोकर विधानसभेवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवा: राजेश पालमकर
शहीद कोठारी बंधू यांच्या स्मरणार्थ अर्धापूर येथे भव्य रक्तदान शिबिर
भोकर विधानसभेसाठी ६८ उमेदवारांनी भरले ७४ अर्ज