सविधान सुरक्षित ठेवायचं असेल तर भोकर विधानसभेवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवा असे वक्तव्य अर्धापूर येथील सभेत नांदेड जिल्हा अध्यक्ष राजेश पालमकर यांनी केले.
अर्धापूर: सविधान सुरक्षित ठेवायचं असेल तर वंचित बहुजनच्या उमेदवारांना निवडून आणा व राजकारण हे कोणत्याही एका जातीवर होत नाही. असे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश पालमकर, यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अर्धापूर येथे वंचित बहुजन पार्टीच्या वतीने दि.१० रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी वंचित बहुजन पार्टीचे भोकर विधानसभा उमेदवार सुरेश राठोड ,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश पालमकर, उपाध्यक्ष रमेश राठोड, सर्वजित बनसोडे, अर्धापूर तालुकाध्यक्ष बंटी भाऊ मोरे, तालुका संघटक दीपक मगर, ॲड .राजरत्न शितळे, शरद सरोदे , यांच्यासह अनेक जण पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
शहीद कोठारी बंधू यांच्या स्मरणार्थ अर्धापूर येथे भव्य रक्तदान शिबिर
पालमकर म्हणाले की संविधान सुरक्षित ठेवायचे असेल तर वंचित बहुजनांच्या उमेदवारांना महाराष्ट्रात निवडून देऊन मा. बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट व वंचित बहुजनांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता वंचित आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून निवडून आणा, असे आव्हान त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले.
या वेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रात परिवर्तन घडणार असल्याचेही सांगितले व जर महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचे सरकार आले तर मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर वेगवेगळं देऊ असे वक्तव्य दिले या वेळी तालुक्यातील बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
More Stories
शहीद कोठारी बंधू यांच्या स्मरणार्थ अर्धापूर येथे भव्य रक्तदान शिबिर
भोकर विधानसभेसाठी ६८ उमेदवारांनी भरले ७४ अर्ज
मतदान केंद्राध्यक्ष व प्रथम मतदान अधिकारी यांचे प्रथम प्रशिक्षण भोकर येथे संपन्न.