ARDHAPUR UPDATE

News | Updates | Blogs

मागील एक महिन्या पासून रोहित्र बंद,शेतकरी संतप्त आंदोलनाचा इशारा.

वीजबिल भरून सुद्धा मागील एक महिन्या पासून डी पी न बसविल्या बद्दल शेतकरी संतप्त, महावितरण अधिकाऱ्यांच्या विरोधात दिला आंदोलनाचा इशारा.

मागील

अर्धापूर/राजेश्वर देशमुख:

शहरातील नागझरी येथे डी पी नं २ आहे, हा डी पी गेल्या एक महिन्या पासून बंद असून त्या मुळे शेतीला पाणी मिळणे आवश्यक असल्याचे सांगत शेतकऱ्यांचा समूह अभियंत्याला भेटायला गेला, अधिकाऱ्यांशी भेटल्या वर आधी सर्वांनी वीजबिल भरणा करा मी आठ दिवसात नवीन डी पी बसवून देतो असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांना वीजबिल भरायला लावले.

हे वाचा: पॅन-आधार जोडण्यासाठी सरकार ने दिली शेवटची तारीख

मागील एक महिन्या पासून रोहित्र बंद असून विहिरीत व बोअर वेल मध्ये पाणी असून देखील पिकांना पाणी देणे अवघड होऊन बसले आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या या तुघलकी कारभारामुळे शेतकरी कमालीचा अडचणीत सापडला आहे. उन्हाचा पारा ४० डिग्री पर्यंत पोहोचले आहे

आणि त्यात पिके पाण्या विना जळत आहेत याला सर्वस्वी महावितरण कंपनी चे अधिकारी कर्मचारी जबाबदार असल्याचे सांगत शेतकऱ्यांचा या अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.

वीजबिल भरणा करूनही महावितरणचे अधिकारी कर्मचारी शेतकऱ्यांना वेठीस धरून मुजोरी करत असतील तर त्यांना जसास तसे उत्तर देऊ, आणि जो पर्यंत डी पी बसवून देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतल्याचे समजते आहे.

RSS
Follow by Email
YouTube
WhatsApp
error: Content is protected !!