ARDHAPUR UPDATE: पांगरी येथील शालिनी किरकण यांची उपशिक्षण अधिकारी पदी निवड, सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव.
अर्धापूर येथून जवळच असलेले पांगरी येथील शेतकरी आनंदराव घनश्याम किरकण यांची मुलगी शालिनी किरकण ह्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2022 रोजी घेतलेल्या परीक्षेचा निकाल लागला असून त्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने त्यांची उपशिक्षण अधिकारी वर्ग – १ पदी निवड करण्यात आली आहे .
शालिनी किरकण यांचे प्राथमिक शिक्षण पांगरी येथे झाले तर माध्यमिक शिक्षण मीनाक्षी देशमुख गर्ल हायस्कूल अर्धापूर येथे झाले . त्यानंतर त्यांचा विवाह झाला त्यांना दोन अपत्य आहेत. त्यांनी पुणे येथे पदवीचे शिक्षण पूर्ण केले .
आनंदराव घनश्याम किरकण यांना तीन अपत्य असून मोठा मुलगा अजय किरकन परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक ( पीएसआय )पदावर कार्यरत आहेत तर लहान मुलगा विजय किरकन हे नागपूर येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.
भूकंप | नांदेड व हिंगोलीत अनेक ठिकाणी धक्के जाणवल्याचे वृत्त
शालिनी किरकण यांची उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दत्ता पाटील कदम भाजपचे जिल्हा अध्यक्ष अॅड़. किशोर देशमुख तालुका सरचिटणीस अवधूत पाटील कदम , आपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम , चेअरमन मारोतराव दुधाटे, नरहरी गोरे , बाळू किरकण , सिद्धार्थ लोखंडे ,बाबुराव सोनवणे , राजाराम कांबळे यांनी अभिनंदन केले आहे त्याचबरोबर तालुक्यातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे .
More Stories
भोकर विधानसभेवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवा: राजेश पालमकर
शहीद कोठारी बंधू यांच्या स्मरणार्थ अर्धापूर येथे भव्य रक्तदान शिबिर
भोकर विधानसभेसाठी ६८ उमेदवारांनी भरले ७४ अर्ज