बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करा असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले आहे.
अर्धापूर अपडेट न्यूज नेटवर्क:
बोगस बियाणे विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
हे वाचा: सोनाजी विठ्ठलराव सरोदे यांची नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात काही ठिकाणी बोगस बियाणे विक्रीच्या घटनांसंदर्भात चर्चा झाली. त्यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुख्य सचिवांना हे निर्देश दिले.
राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांत भरारी पथके तयार करून बियाणे विक्रीवर लक्ष ठेवावे.
हे वाचा: शिवरस्ता बंद केल्याने माजी सैनिक शेतक-याची असीही व्यथा!
बियाणे विक्रेते योग्य बियाणे योग्य दरात विकत आहेत की नाही, ते तपासावे. बोगस बियाणे विक्री करताना आढळलेल्यांवर कोणत्याही दबावाला बळी न पडता काटेकोर कारवाई करण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देशात म्हटले आहे.
More Stories
शहीद कोठारी बंधू यांच्या स्मरणार्थ अर्धापूर येथे भव्य रक्तदान शिबिर
भोकर विधानसभेसाठी ६८ उमेदवारांनी भरले ७४ अर्ज
मतदान केंद्राध्यक्ष व प्रथम मतदान अधिकारी यांचे प्रथम प्रशिक्षण भोकर येथे संपन्न.