ARDHAPUR UPDATE

News | Updates | Blogs

मतदान केंद्राध्यक्ष व प्रथम मतदान अधिकारी यांचे प्रथम प्रशिक्षण भोकर येथे संपन्न.

मतदान

मतदान केंद्राध्यक्ष व प्रथम मतदान अधिकारी यांचे प्रथम प्रशिक्षण ओम लॉन्स, भोकर व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा भोकर येथे संपन्न आहे.

मा. श्री. प्रविण मेंगशेट्टी (निवडणूक निर्णय अधिकारी, 85-भोकर विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी भोकर) यांचे सूक्ष्म नियोजन व मार्गदर्शनप्रमाणे मा. श्री. रेणुकादास देवणीकर (सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अर्धापूर) व मा. श्री. आनंद देऊळगावकर (सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मुदखेड) यांनी ओम लॉन्स या ठिकाणी मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे कर्तव्य काय आहे याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना सविस्तर असे मार्गदर्शन केले.

अर्धापूर तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळेवर शिक्षणाधिकारी कडक कारवाई करणार का? राज्य शासनाच्या नियमांचे उल्लंघन

85-भोकर मतदारसंघ मधील नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचारी यांना टपाली मतदान करता यावे याकरिता त्यांचे परिपूर्ण फॉर्म हस्तगत करुन घेण्यासाठी ओम लॉन्स, भोकर या ठिकाणीच मा. संतोष कामठेकर (नायब तहसीलदार, मुदखेड) यांच्या मार्गदर्शनप्रमाणे जिल्ह्यातील 9 मतदारसंघ निहाय तसेच जिल्हा बाहेरील मतदारसंघ यांच्याकरिता एक अश्या 10 टेबलची व्यवस्था करण्यात आली. यासाठी 20 कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

तसेच मा. श्री. विनोद गुंडमवार (सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भोकर) यांच्या मार्गदर्शनप्रमाणे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, बायपास रोड याठिकाणी मतदारसंघ मधील नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व प्रथम मतदान अधिकारी यांचे EVM मशीनचे हॅन्डसऑन-प्रशिक्षण झोन निहाय नियुक्त 30 झोनल अधिकारी यांनी संबंधित मतदान अधिकारी व कर्मचारी यांना दिले आहे. या प्रशिक्षण करीता मास्टर ट्रेनरसह एकूण 65 कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

ओम लॉन्स येथील प्रशिक्षणचे नियोजन मा. श्री. शिवाजी जोगदंड (नायब तहसीलदार, अर्धापूर) यांच्या मार्गदर्शनप्रमाणे मंडळ अधिकारी श्री. मनोज खंदारे, श्री. सतिष दंतुलवाड, ग्राम महसूल अधिकारी श्री. अनिल मुनेश्वर, श्री. रुपेश जाधव, नियुक्त शिपाई व महसूल सेवक यांनी केले. तसेच आश्रम शाळा येथील प्रशिक्षणचे नियोजन मा. श्री. मारोतराव जगताप (नायब तहसीलदार, मुदखेड) व मा. श्री. सय्यद उमर (नायब तहसीलदार, भोकर) यांच्या मार्गदर्शनप्रमाणे मंडळ अधिकारी श्री. हयून पठाण, श्री. नवीन रेड्डी, ग्राम महसूल अधिकारी श्री. गोपाल माने, राजू चव्हाण, बाबुराव मुळेकर, नियुक्त शिपाई व महसूल सेवक यांनी केले.

एकूण मतदान केंद्राध्यक्ष 441 पैकी 419 मतदान केंद्राध्यक्ष उपस्थित होते तसेच एकूण 436 प्रथम मतदान अधिकारी पैकी 417 प्रथम मतदान अधिकारी उपस्थित होते. 41 अनुपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक विभाग भोकर या कार्यालयातून कारणे दाखवा नोटीस पण निर्गमित करण्यात आल्या आहेत.

संपादक

RSS
Follow by Email
YouTube
WhatsApp
error: Content is protected !!