शंकरराव चव्हाण महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत चालू असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.पठाण यांनी दिली आहे.
अजित गट्टानी:
अर्धापूर शहरातील नामांकित व नॅकचे अ दर्जा प्राप्त शंकरराव चव्हाण महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए., बी.कॉम प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा सुरळीतपणे सुरू आहे.
हे वाचा: अन्यथा नांदेड विमानतळ आम्ही पुढील तीन महिन्यात सुरू करु
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, नांदेडच्या सन्माननीय व्यवस्थापन मंडळ व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.पठाण जे.सी. यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रसंयोजक प्रा.डाॅ.काजी एम.के.देळुबकर, बहिस्थ पर्यवेक्षक प्रा.जाधव धम्मपाल, परीक्षा सहाय्यक अनिल पत्रे, प्रा.महाजन शिवहार हे परीक्षेचे काम पाहत आहे.
महाविद्यालयास यापूर्वी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विभागीय केंद्र नांदेडकडून उत्कृष्ट परीक्षा केंद्र म्हणून गौरविण्यात आलेला आहे.
या परीक्षेत पर्यवेक्षक म्हणून प्रा.डॉ.म्हस्के रत्नमाला, प्रा.मोहम्मद इस्माईल, प्रा.आव्हाड बालाजी, डाॅ.लोकरे पी.एन., प्रा.बलदिपसिंघ ठाकुर, डाॅ.विनोद शिंदे, डाॅ.साईनाथ शेटोड, प्रा.माधव टेंभुर्णे, प्रा.देशमुख शंकर, डाॅ.पचलिंग हनुमंत, प्रा.प्रमोद हापगुंडे, प्रा.राम राजेगोरे, प्रा.कल्पना जगताप, प्रा.फाटेकर एस.ए. हे पर्यवेक्षण करीत आहेत. या कामी बालाजी कवठेकर, दिपक सौदा हे सहकार्य करीत आहेत.
More Stories
भोकर विधानसभेवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवा: राजेश पालमकर
शहीद कोठारी बंधू यांच्या स्मरणार्थ अर्धापूर येथे भव्य रक्तदान शिबिर
भोकर विधानसभेसाठी ६८ उमेदवारांनी भरले ७४ अर्ज